काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील धानोरा फाटा येथे असलेल्या श्रीक्षेत्र काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात बुधवार, २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मुर्डेश्वर पिठाधिश ब्रम्हलीन बालयोगी काशीगिरी महाराज यांच्या पादुका पूजन, लहू रुद्राभिषेक, स्वाहाकार हवन आदी धार्मिक विधी उत्साहात पार पडल्या असल्याची माहिती महादेवानंद सरस्वती महाराज यांनी दिली आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त धानोरा फाटा येथे असलेल्या श्रीक्षेत्र काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात सकाळी अकरा वाजता धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. यावेळी उपस्थित भाविकांना सकाळी सात वाजेपासून काशी विश्वेश्वर महादेव मंदिराचे पिठाधिश बालयोगी सर्वानंद सरस्वती महाराज यांनी गुरुमंत्र देत आर्शिवाद दिला. गुरुपौर्णिमेनिमित्त ह. भ. प. शिवाजी महाराज तळेकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. 

यावेळी ह. भ. प. शिवाजी महाराज तळेकर यांच्या कीर्तनावेळी ह. भ. प. भगवान महाराज जंजाळ, ह. भ. प. जगन महाराज बनकर, ह. भ. प. गजानन महाराज गवळी, ह. भ. प. पंढरीनाथ महाराज दळवी, ह. भ. प. कैलास महाराज, ह. भ. प. सोमनाथ महाराज बनकर, ह. भ. प. जगदिश महाराज कवाल यांच्यासह संतकृपा वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी उपस्थित होते. कीर्तनानंतर उपस्थित भाविकांना शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख विठ्ठल बदर पाटील यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 

यावेळी सुनिल मिरकर, राधाकिसन काकडे, सुरेश बनकर, दिलीप दानेकर, प्रेमसिंग उटाडे, मनोज मोरुल्लू, नारायण उटाडे, योगेश काकडे, मच्छिंद्र काकडे, नाना काकडे, देविदास पंडित, फकिरा इंगळे, सुभाष बमनावत, बाळू काकडे, बाबूराथ चाथे, संदीप शिरसाट, नथ्थू गोठवाल आदींची उपस्थिती होती. सायंकाळी मंदिरात गुरुपौणिमेनिमित्त दिपोत्सव साजरा करण्यात आला.